breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

109 तास बोअरवेलमध्ये काळाशी झुंज देणाऱ्या फतेहवीरचा मृत्यू

नवी दिल्ली –  पंजाबमधील संगरूर येथे घराबाहेर खेळताना 125 फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या तीन वर्षाच्या फतेहवीर सिंह याचा मृत्यू झाला आहे. बोअरवेलमध्ये अडकलेल्या फतेहवीरला मंगळवारी सकाळी बाहेर काढण्यात आले व तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, बचाव पथकाने घटनास्थळी पोहचण्यास विलंब केल्यानेच फतेहवीरचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

फतेहवीरच्या मनाला चटका लावणाऱ्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही फतेहवीरच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेनंतर त्यांनी राज्यातील सगळ्या बोरवेलची तपासणी कऱण्याचे आदेश दिले आहेत.

ज्यावेळी फतेहवीरला बोरवेलमधून बाहेर काढण्यात आले त्यावेळी त्याच्या संपूर्ण शरीरावर सूज होती. त्याच्या बचावासाठी एनडीआरएफ आणि पोलिसांनी तब्बल 109 तास अथक प्रयत्न केले. पण अखेर त्यांच्या पदरी निराशा आली.

गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घराबाहेर खेळताना फतेहवीर बोरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर तीन वर्षांचा मुलगा बोरवेलमध्ये पडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे गावभर पसरले. नंतर एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले होते. फतेहवीरला बाहेर काढण्यासाठी बोरवेलला समांतर दुसरी बोरवेल खोदण्यात आली. बोरवेलमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय वाढवण्यात आला होता. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक कॅमेराही लावण्यात आला होता. एनडीआरएफचे 26 कर्मचारी या मोहिमेत काम करत होते.

घटनास्थळावर 24 तास डॉक्टरांची एक टीम अॅम्ब्युलन्ससह सज्ज ठेवण्यात आली होती. 40 तासानंतर शनिवारी त्याच्या शरीराची हालचाल कॅमेऱ्याने टीपली होती. तो जिवंत असल्याचे बघून सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. 10 जून रोजी फतेहवीरचा 3 वाढदिवस साजरा करण्यात आला होता. फतेहवीरच्या सुखरुप सुटकेसाठी त्याच्या कुटुंबीयांबरोबरच नातलगांनी ख्वाजा पीरला नवसही केला होता. आजूबाजूच्या गावातील हजारो लोकं त्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमची मदत करत होते. सगळा गावचं फतेहवीरने सुखरुप बाहेर यावे यासाठी परमेश्वराची प्रार्थना करत होता. फतेहवीरला बाहेर काढल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला होता, मात्र त्याच्या मृत्यूची बातमी येताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button