breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी; सभागृहात हशा!

नागपूर : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज संपण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत सविस्तर भाषण केलं. यावेळी त्यांनी विदर्भाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले नसल्याचं म्हणत विरोधी पक्षांवर टीका केली. त्याचवेळी, प्रविण दरेकर यांनी तो मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्यांचे आपण आभार मानत असल्याचं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी प्रविण दरेकरांचं कौतुक केल्यानंतर समोरच्या बाकांवरून काही विरोधी पक्षातील आमदारांनी, आता त्यांना मंत्री करा, असं म्हणत फडणवीसांना कोपरखळी मारली. त्यावर फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली. आमच्या पक्षात मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो. एक लक्षात ठेवा. आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची. हरएक के अच्छे दिन आएंगे, असं फडणवीसांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

हेही वाचा   –  ‘चाहिए खर्चा तो निकालो मोर्चा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल 

यानंतर फडणवीसांच्या मागे बसलेल्या मंत्रई गिरीश महाजन यांनी, सीनिअर लोकांनीही आशा ठेवावी का? असा प्रश्न विचारला. यावरूनही फडणवीसांनी टोला लगावला, गिरीशभाऊ म्हणतायत सीनिअर लोकांनी पण आशा ठेवायची का? आपण सीनिअर लोकांचा स्कोप थोडा कमी केलाय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button