breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विजेचा लंपडाव सुरु, औद्योगिक वसहतीमधील उद्योजक चांगलेच त्रस्त

पिंपरी –  मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होताच ‘महावितरण’च्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा अक्षरश: ‘फज्जा’ उडाला असून, परिणामी घरगुती वीज ग्राहकांबरोबरच औद्योगिक वसहतीमधील उद्योजक चांगलेच त्रस्त झाले आहे. महावितरण’च्या कारभाराचा निषेध करून लघुद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.

शहरात झालेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात ‘महावितरण’च्या कामाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. औद्योगिक परिसरात अघोषित भारनियमन केले जात असून, ‘महावितरण’च्या ढिसाळ कारभारामुळे अनेक उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या वतीने करण्यात आला. ‘महावितरण’च्या या अनागोंदी कारभाराचा निषेध करून सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी संध्याकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसात ‘महावितरण’च्या कारभाराचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पावसात संपूर्ण औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यातील काही भागात रात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु, सोमवारी (१० जून) दुपारी चार वाजेपर्यंत भोसरी भागातील शांतीनगर, पेठ क्रमांक ७ आणि १०, एमआयडीसीतील एसटीजे या औद्योगिक ब्लॉकमधील वीजपुरवठा खंडितच होता. हा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली. खंडित वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ‘महावितरण’कडे वारंवार तक्रारीदेखील करण्यात आल्या; मात्र त्याची कोणतीही दखल या कार्यालयाकडून घेण्यात आली नसल्याचा दावा काही उद्योजकांनी केला.

शहरातील लघुद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांनी सोमवारी ‘महावितरण’च्या भोसरी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मान्सूनपूर्व पहिल्या पावसातच अशी परिस्थिती निर्माण होणार असेल तर पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. या वेळी संघटनेचे शाशिकांत सराफ, शांताराम पिसाळ, सचिन आडक, मनसुख यांच्या सह सुमारे दीडशे उद्योजक जमा झाले होते.

तोडगा काढण्यासाठी आज बैठक

आंदोलन करूनही सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे त्रस्त उद्योजकांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती सांगितली. यावर ठोस तोडगा काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी आज, मंगळवारी (११ जून) ‘महावितरण’चे वरिष्ठ अधिकारी आणि भोसरी विभागीय कार्यालयातील अधिकारी यांची बैठक बोलवली असून, अडचणी मांडण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींना बोलाविले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button