breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

हिमायतनगर भाजपा तर्फे महाएल्गार दूध आंदोलन

हिमायतनगर | नागेश शिंदे |दुधाला अनुदान मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका शाखे कडून हिमायतनगर ते किनवट राज्यमहामार्गावर भा.ज.पा.कडून रास्ता रोको करत आंदोलन करुण ह्या तीघाडी सरकारचा जाहिर निषेध केला व हिमायतनगर चे तहसीलदार यांच्या द्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमि वरमहाराष्ट्रातील जनतेवर विशेष:शेतकरी बांधवावर आसमानी व सुलतानी संकट कोसळलेले असताना गोरगरीब शेतकऱ्यांकडून गाईचे व म्हशिचे दूध उत्पादन करुण त्यांचा कसा बसा उदर निर्वाह चालु होता परंतु या तीघाडी सरकार कडून घेण्यात आलेल्या एका चुकिच्या निर्णयामुळे आज अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होऊन त्यांच्या वर उपासमारिची वेळ आलि आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे खाजदार प्रताप पाटिल चीखलीकर ,माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटिल,माजी जिल्हा अध्यक्ष रामपाटिल ,जिल्हा अध्यक्ष गोजेगाकर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली आज हिमायतनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोरगरीब शेतकऱ्यांना गाईच्या दूधाला सरसगट प्रति लीटर 10 रू अनुदान द्या,दूध भुकटी निर्यातील प्रति किलो 50 रु अनुदान द्या,दुध खरेदिचा दर प्रति लीटर 30 रु करा ,गोर गरीब शेतकऱ्यांना गाई व म्हशिवर 100 % अनुदानावर उपलब्ध करुण द्या या मागन्याचे निवेदन आज हिमायतनगर चे नायबतहसीलदार तामसकर साहेब यांच्या द्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जेष्ठनेते किशनराव वानखेडे काका,सुधाकर पाटिल,तालुका अध्यक्ष आशिष सकवान,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी,शहर अध्यक्ष खंडू सर चव्हाण,राम जाधव,विनायक ढोणे,चांदराव कदम,अमोल सांगोळकर,हीदायद खान,प्रशांत ढोले,किशोर रायेवार,राहुल देवसरकर,शुभम संगनवार, रॉबीन चव्हाण, अमोल सूर्यवंशी सह आदि शेतकरी यावेळी या अंदोलनासाठी उपस्थित होते, भा.ज.पा. तर्फे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन झाल्या नंतर हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे साहेब,सहाय्यक पोलिस निरीक्षक इगळे साहेब ,बिट जमादार लपशेटवार साहेब यांनी हा मुख्य रस्ता पुन्हा वाहतूकिसाठी खुला करुण वाहतुक सुरळीत करुण दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button