breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेतील अलास्का येथे हवेतच दोन विमानांची भीषण टक्कर, ७ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अलास्का राज्यात दोन छोट्या विमानांची हवेतच भीषण टक्कर झाली. या दुर्घटनेत दोन्ही विमानातील मिळून सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लोकप्रतिनिधी असलेले गॅरी नोप यांचा समावेश आहे. ते स्वतःचे एक छोटे विमान चालवत होते. तर दुसऱ्या विमानातील ४ प्रवासी ठार झाले आहेत. या दोन्ही विमानातील कुणीही बचावलेले नाही. हा अपघात अलास्का राज्यातील केनाई शहराजवळील सॉल्डोटना विमानतळाजवळ घडला आहे.

या दुर्घटनेच्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला ते गॅरी नोप हे स्वतः आपले विमान चालवीत होते. तर दुसरे विमान दक्षिण कॅरोलीना येथून ४ पर्यटकांना घेऊन चालले होते. या वैमानिकाशिवाय एक गाईड होता. ही दोन विमानांची टक्कर एवढी भीषण होती की, दोन्ही विमानातील सर्व सातही जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन विमानांची आकाशात टक्कर होताच या विमानाचे अवशेष महामार्गावर कोसळले. त्यामुळे महामार्ग बंद करण्यात आला होता. दुर्घटनाग्रस्त झालेले एक विमान “डी हव्हीलँड डी एच सी – 2 बीव्हरचे असल्याची माहिती फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन दिली आहे. या दुर्घटनेचा तपास नॅशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन एजन्सी करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button