breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मेडिकलमध्ये मराठा आरक्षणाने प्रवेश, इतरांवर अन्याय : गुणरत्न सदावर्ते
नवी दिल्ली | मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी आजपासून सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात होत आहे. या तीन दिवसात दोन्ही पक्षकारांना आपआपली बाजू मांडण्यासाठी दीड-दीड दिवसांचा अवधी आहे. यापूर्वी 15 जुलैला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत, कोर्टाने कोणताही अंतरिम आदेश दिला नव्हता. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला होता. आता तोच दिलासा कायम राहतो की नाही, याबाबत संपूर्ण राज्याचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लागलं आहे.
वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण आणि मराठा आरक्षणाबाबतची मूळ याचिका हे दोन महत्त्वाचे मुद्दे या सुनावणीत चर्चिला जाईल.