breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यातील शिराळा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस (व्हीडिओ)
शिराळा । महाईन्यूज । प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील शिराळा परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह धो-धो सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. विशेष म्हणजे, काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. अगोदरच कोरोनाचा भीती आणि आता आस्मानी संकटामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
पहा व्हीडिओ