breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दि. पुणे लॉयर्स कंझ्युमर्स को.ऑप. सोसायटीच्या संचालक पदी ॲड. अतिश लांडगे यांची बहुमताने निवड

पिंपरी: दि. पुणे लॉयर्स कंझ्युमर्स को.ऑप. सोसायटी लि.ची निवडणूक दि.२४ फेब्रुवारी रोजी पार पडली. सोसायटी निवडणुकीमध्ये ७५०० च्या जवळपास सभासद आहेत. सदर निवडणुकीसाठी २,९८५ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी मतदान केंद्र बारामती, राजगुरुनगर व शिवाजीनगर न्यायालय पुणे येथे होते. वकिलांची सोसायटी ही ६५ वर्षे जुनी असून सोसायटीची १२५ कोटींची वार्षिक उलाढाल आहे.

आजपर्यंत पिंपरी चिंचवड न्यायालयात वकिली करणारे बऱ्याच वकिलांनी निवडणुकीमध्ये नशीब आजमावले होते. पण कोणालाही यश मिळाले नव्हते. ॲड. अतिश लांडगे यांच्या रूपाने पिंपरी न्यायालयात वकिली करणारे ॲड.लांडगे पहिले सोसायटीचे संचालक आहेत. येणाऱ्या काळात नेहरूनगर येथील न्यायालयात सोसायटीची सेवा देणे. राजगुरुनगर न्यायालयात सोसायटी काउंटर तसेच ई फायलींग, स्टॅम्प विक्री, स्टेशनरी, केस लॉ सॉफ्टवेअर, नवीन वकिलांना सोसायटी सभासद करून घेण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button