ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

राजमाता जिजाऊच्या फार्मसी महाविद्यालयाला NAAC-A ग्रेड मिळाल्याबद्दल सन्मान सोहळा

पिंपरी : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडूळगाव येथील फार्मसी महाविद्यालयाला NAAC-A ग्रेड मिळाल्याबद्दल सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचा सन्मान सोहळा महाविद्यालयात पार पडला. यावेळी फार्मास्युटिकल क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या हस्ते प्राध्यापक व कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विलास लांडे, खजिनदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांत लांडे, प्राचार्य डॉ. किशोर जैन, फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. महेश बुरांडे, प्राचार्य अशोक पाटील, उपप्राचार्य किरण चौधरी, प्राचार्य डॉ. रविंद्र चिंतामणी, रात्र प्रशाला प्राचार्या श्रेया दाणी, डॉ. नेहा बोरसे, गणेश शिंदे, सुमित मुंगसे आदींसह मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.
पुण्यातील फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. महेश बुरांडे म्हणाले, आरजेएसपीएम कॉलेजला नॅक कमिटीकडून ए ग्रेड मिळाल्याने मला प्रेरणा मिळाली. प्राचार्य डॉ. किशोर जैन यांनी एकदा शब्द दिला की तो सत्यात उतरेपर्यंत ते शांत बसत नाहीत. लांडे साहेबांचा जीवन प्रवास ऐकल्यानंतर मला विशेष वाटले. कोणत्याही प्रकारची माहिती नसताना अनुभवाच्या जोरावर त्यांनी शिक्षणाबरोबरच उद्योग क्षेत्रात जी भरारी घेतली आहे. ती वाखानन्याजोगी आहे.

संस्थेचे विश्वस्त विक्रांत लांडे म्हणाले, फार्मसी कॉलेजमधील सर्व स्टाफ व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व कर्मचा-यांच्या प्रयत्नांमुळेच आज एक मोठी अचिव्हमेंट पूर्ण झाली आहे. एवढ्यावरच न थांबता पुढील दहा वर्षाच्या निर्णायक कार्यकाळात आपल्याला याहून अधिक प्रयत्नशील रहावे लागणार आहे. आपले पुढील टार्गेट हे आरजेएसपीएमचे मेडिकल कॉलेज करण्याचे आहे. त्यासाठी सर्वजन एकत्रीत येऊन प्रयत्न करतील, अशी मला अपेक्षा आहे.

सुधीर मुंगसे म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलास लांडे यांचा राजकीय पींड असला तरी त्यांचा शैक्षणिक दृष्टीकोण सर्वांगीन विकास साधणारा आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दुरदृष्टीमुळेच राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची महाविद्यालये आज आघाडीवर आहेत. ते वयाने ज्येष्ठ असले तरी त्यांच्यातील काम करण्याची उर्जा ही विशीतल्या तरुणाला सुध्दा लाजवणारी आहे. दैनंदीन जीवनामध्ये एखादी गोष्ट वारंवार करत राहिलो तर ती एक दिवस सर्वोत्कृष्ट बनते, असे अॅरिस्टोक्रॅटचे उदाहरणही त्यांनी दिले.

शिक्षण क्षेत्रात संस्थेची उभारणी करताना स्व. अंकुशराव लांडगे, खजिनदार अजित गव्हाणे आम्ही एकत्र येऊन राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यांतर्गत महाविद्यालये उभी करत असताना भोसरीसह ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. आज मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या संस्थेत फार्मसीसह वेगवेगळ्या शाखांमध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. नुकतेच संस्थेला ए ग्रेड मिळालेला आहे. यामध्ये प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सर्व स्टाफ यांचे योगदान आहे. संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. भविष्यात A+, A++ मिळवण्याचे उद्दीष्ठ साध्य करायचे आहे. तसेच, संस्थेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा देखील मानस आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button