breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#waragainstcorona: कोरोना आणि लॉकडानमध्येही पुण्यात पार पडला अनोखा विवाह सोहळा

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

यंदा लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची अनेक इच्छुकांची अपेक्षा ती अपेक्षाच राहिली आहे.  पण, आज पुण्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात लॉकडाउनचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. अशा परिस्थितीत एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. नवरदेव हर्षल पवार हा ग्रीन कोरोना झोन असलेल्या धनकवडीचा राहणारा आहे. तर नवरी मुलगी रेश्मा पवार ही रेड कोरोना झोन असलेल्या कोंढवा परिसरातील राहणारी आहे.

तर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी जोडप्याची बिदाई केली. यावेळी नवरदेवाची गाडीही सॅनिटायझरने फवारण्यात आली. तसंच नवदाम्पत्याला खास सॅनिटाईज फुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. असा अनोखा आणि  कायम आठवणीत राहणारा लॉकडाउनमधला लग्नाचा सोहळा अखेर संपन्न झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button