मनोरंजन

श्रेयस तळपदेच्या घरी “नन्ही परी’…

गोलमाल सिरीजमधील मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे यांच्या लग्नास सुमारे 14 वर्षे झाली आहेत. आता या दाम्पत्यांच्या घरी एक नन्ही परी आली आहे. हे दोघे सरोगेसीद्वारे नुकतेच 4 मे रोजी आई-बाबा बनले आहेत.

सरोगेसीद्वारे आई-वडील होण्याचा श्रेयस आणि दीप्ती यांनी निश्‍चित केले. त्यानंतर सरोगेसी मदरद्वारे त्यांना 10 ते 12 मे दरम्यानची डेट देण्यात आली होती. त्यामुळे दोघेही सुटीसाठी हॉंगकॉंगला गेले होते. तेथे क्रुजवर जाण्यापूर्वीच त्यांना सरोगेसी मदर वेळेपूर्वीच बाळाला जन्म देणार असल्याचे त्यांना कळले आणि ते तातडीने परतले.

श्रेयस आणि दिप्ती विमानतळावर पोहचताच त्यांना “गुड न्यूज’ मिळाली. त्यानंतर ते थेट हॉस्पीटलमध्येच पोहचले. श्रेयसने आनंद व्यक्‍त करत सांगितले की, आमच्या कुटुंबात नन्ही परीचे आगमन झाल्याने आम्ही सर्वजण खूपच आनंदी आहोत. मला वाटते आमची परी खुपच हट्टी आहे. त्यामुळेच आम्ही तिच्याशिवाय हॉंगकॉंगला जावू नये असे तिला वाटले असावे.

मुलीच्या नावाबाबत श्रेयसला विचारले असता तो म्हणाला, आम्ही काही नावांची शॉर्टलिस्ट केली आहे. तसेच अनेक नातेवाईकांसह मित्रांनीही नावे सुचविली आहेत. यामुळे आम्ही गोंधळात पडलो असून लवकरच दोघेही एखादे नाव निश्‍चित करू, असे त्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button