breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजन

हर हर महादेव : चित्रपट संभाजी ब्रिगेड बंद पाडणार!

पुणे: ‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर आला आणि तमाम प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्याला ग्रहण लागले आहेत. या चित्रपटावर आक्षेप घेतला असून चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याची तक्रार बांदल वंशजांनी केली होती.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडनेही चित्रपट मागे घ्यावा, अशी मागणी करत सिनेमागृहात शो बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोप करीत चित्रपटाचे निर्माते सुनिल फडतरे यांच्या सांगलीतील घरासमोर मावळा युवा महासंघाने आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी निदर्शने आणि घोषणाबाजी केली आहे. यावेळी इतिहासाचे विकृतीकरण करून त्याची मांडणी करणाऱ्या निर्माते फडतरे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.आता संभाजी ब्रिगेडनेही या वादात उडी घेतली असून, शिवप्रेमी संस्था, संघटना विरोधासाठी रस्तयावर उतरत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button