breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘विधु विनोद चोप्रांमुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली’ : चेतन भगत

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक सेलिब्रिटी नेपोटिझम आणि आऊटसायडर्स यावर आपली मतं मांडताना आणि आपले डिप्रेशनचे अनुभव शेअर करताना दिसत आहेत. यात आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील उडी घेतली आहे. चेतन भगत यांनी फिल्ममेकर आणि निर्माते विधु विनोद चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी जाहीरपणे माझा अपमान केला. त्यांच्यामुळे आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती, असा गंभीर आरोप भगत यांनी केला आहे. चेतन भगत यांच्या ‘फाईव्ह प्वाईंट सम वन’ पुस्तकावर आधारीत 2009 मध्ये बनलेल्या ‘3 इडियट्स’ चित्रपटाची निर्मिती विधु विनोद चोप्रा यांनी केली होती.

चेतन भगत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा चित्रपटाबद्दल समीक्षकांनी समजतूदारपणे लिहावं. त्यांनी ओव्हरस्मार्ट होऊन लिखाण करू नये. त्यांनी निष्पक्ष आणि समजूतदार व्हावं, काही घाणेरड्या चाली खेळू नयेत, आपण आधीच अनेकांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे’ असं भगत यांनी म्हटलं.

चेतन भगत यांच्या ट्विटला विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा यांनी उत्तर दिलं आहे. ‘समजूतदारपणाचा स्तर यापेक्षा खाली जाणार नाही, असा विचार काही जण करतात. मात्र तरीही दुर्दैवानं तो स्तर घसरतो,’ असं अनुपमा यांनी म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button