मनोरंजन
जेव्हा नीता अंबानींनी श्रीदेवी यांच्या गाण्यावर धरला ठेका…
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं आहे. पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
याचदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ईशाच्या आई नीता अंबानी डान्स करताना दिसत आहेत. सोमवारी ईशाचा साखरपुडा झाला असून त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये नीता अंबानी यांनी डान्स करत उपस्थितांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे त्यांनी अभिनेत्री श्रीदेवीच्या इंग्लिश-विंग्लिश चित्रपटातील नवराई माझी लाडाची लाडाची गं… या गाण्यावर डान्स केला.