breaking-newsपिंपरी / चिंचवड

लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणा-यांचा विक्रम, साडेतीन हजार नागरिकांवर कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. या पाच दिवसात सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले.

तर ८८ जणांची वाहनं पोलिसांनी जप्त केली. विनामास्क, डबलसीट दुचाकी चालवणे, संचारबंदीचे उल्लंघन, नियम डावलून दुकाने खुली ठेवणे यासाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोमवारपासून शनिवारपर्यंत दाखल केलेले गुन्हे 

सोमवारी, १३ जुलै – ७४४ गुन्हे दाखल, ४५ वाहने जप्त, मंगळवार, १४ जुलै – ७५२ गुन्हे दाखल, बुधवार, १५ जुलै – ५५८ गुन्हे दाखल, १ वाहनं जप्त, गुरुवार, १६ जुलै – ६३५ गुन्हे दाखल, ५ वाहनं जप्त, शुक्रवार, १७ जुलै – ६११ गुन्हे दाखल, ३७ वाहनं जप्त, शनिवार, १८ जुलै – २२४ गुन्हे दाखल
एकूण – ३५२४ गुन्हे दाखल, ८८ वाहनं जप्त.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button