breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची”- पंकजा मुंडे…

व्हेलन्टाइन डेच्या निमित्ताने अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली त्यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.” ही घटना कमालीचा विचित्र प्रकार आहे. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची असा” सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

याबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी ट्विट केलंय की, “मुलींनाच शपथ का? त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर अ‍ॅसिड फेकणार नाही. आणि जर कोणी बघितले तर त्याला जबरदस्त जवाब देणार” असं त्यांनी सांगितले. 

चांदूर रेल्वेच्या महिला कला, वाणिज्य  महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेम्भुर्णी गावात सुरू आहे. त्या शिबिरात ही शपथ घेण्यात आली. प्रदीप दंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामागे प्रेमातून सातत्याने होणाऱ्या हिंसक घटनांची पार्श्वभूमी आहे. शपथ देण्यापूर्वी विद्यार्थांना ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर दंदे यांनी मार्गदर्शन केले. तरुण विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराचा विषय देखील त्यादरम्यान उलगडण्यात आला. त्यानंतर मुलींना ही शपथ देण्यात आली. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button