breaking-newsपुणे

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, प्रकृती स्थिर

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल झाल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्यावर मागील 8 दिवसांपासून सिंहगड रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तथापि, उपचार घेऊनही प्रकृती सुधारणा झाली नसल्याने रुबी हॉल क्लीनिकमध्ये दाखल झाल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दुसरीकडे राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक सवर्सामान्य नागरिकांसह सेलिब्रेटी, राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता शिवसेनेचे धडाडीचे आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांसह इतर अधिकाऱ्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. नरेंद्र दराडे हे येवला शहरात राहतात. काही दिवसांपूर्वी ते नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांना समजले. यानंतर दराडे यांनी तातडीने कोरोना तपासणी केली.

त्या तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दराडे यांनी उपचारासाठी मुंबईत धाव घेतली. त्यांच्यावर पुढील तपासणीनंतर लीलावती किंवा फोर्टिस रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली.

दरम्यान, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचीही काल कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल येईपर्यंत सगळं सोनई गाव चिंतेत होतं. मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला. शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. सुनिता गडाख यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काल राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोना विषाणु संसर्ग झाला आहे. औरंगाबाद येथे करण्यात आलेल्या रॅपीट अॅन्टीजन टेस्टमध्ये ही धक्कादायाक बाब समोर आली आहे. आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या दररोज संपर्कात असलेल्या समर्थकांचे मात्र धाबे दणाणले आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १८) दुपारी त्यांच्या पाथरी येथील निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button