breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

गटारी आमावस्या असली तरी नागरिकांनी घरातच राहिले पाहिजे – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

उद्या गटारी आमवस्या आहे. त्याअनुषंगाने मित्रांसोबत पार्ट्या करण्यावर तरुणांचा भर असणार आहे. तर, सध्या कोरोनापासून दूर राहण्यासाठी पार्टी करण्याच्या इच्छेला मुरड घालून आपापल्या आप्तेष्टांसोबत घरात राहणे पसंत करा. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करावीच लागेल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सांगितले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. आज रविवारच्या निमित्ताने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेसबुकद्वारे लाईव्ह येऊन नागरिकांना काही सूचना केल्या आहेत.

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात 14 जुलैपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यातील पाच दिवस पूर्ण झाले आहेत. आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने, भाजीपाल्याची दुकाने सुरु राहणार आहेत. लॉकडाऊनमध्ये काही नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. जे कायद्याचे पालन करणार नाहीत. इतरांच्या आरोग्याची निगा राखणार नाहीत. आरोग्य धोक्यात आणतील. त्या सगळ्यांवर कडक कारवाई करावी लागेल.

आता कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे. त्यासाठी स्वतःवर बंधण घातले पाहिजे. तरच आपण अनलॉक यशस्वी करू शकणार आहोत. अन्यथा शासकीय नियमांचे पालन अथवा सोशल डिस्टंसिंगचा अवलंब न केल्यास पुन्हा आपल्या नशिबी लॉकडाऊन आहे. घरात असताना डीप ब्रिदींग एक्सरसाईज करा. बी-सी-डी व्हिटॅमीन, झींक या टॅबलेट्स आवश्य घेतल्या पाहिजेत. कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे, असेही हर्डीकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button