breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशनतर्फे ‘हरित वारी, निर्मल वारी’; पालखी मार्गस्थ होताच रस्ता केला चकाचक

पिंपरी। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिघीतून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होताच महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन, अविरत श्रमदान आणि सायकल मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘हरित वारी, निर्मल वारी’ अंतर्गत रस्ता चकाचक केला. मॅगझीन चौक ते दिघी परिसरात गुरुवारी (दि. 27)स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी (दि. 26)भोसरीत दाखल झाला होता. मॅगझीन चौक,  दिघी मार्गे महाराजांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. विविध सामाजिक संस्थांनी पालखी सोहळ्यातील वारक-यांना अन्नदान, बिस्किटांचे, चहा, पाणी वाटप करण्यात आले.
त्यामुळे रस्त्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, केळीचे साल असा कचरा निर्माण झाला होता.  महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन, अविरत श्रमदान आणि सायकल मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  गुरुवारी (दि. 27)स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ‘हरित वारी, निर्मल वारी’ अंतर्गत स्वच्छता मोहिम राबवित रस्ता चकाचक केला. पालखी जाताच रस्ता चकाचक झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, जितेंद्र माळी, अॅड. सुनील कदम,  आदित्य कदम, प्रा. गणेश पानसरे, शिवदास हिंगमिरे, दिपक माळवदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button