breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘राष्ट्रवादी’चा नियमबाह्य आवाज सभागृहाबाहेर काढला ; महापाैरांचा विनंतीवजा आदेश

पिंपरी – महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भाजपकडून विरोधकांचा आवाज दाबला जातोय, असा सतत आरोप राष्ट्रवादी काॅग्रेस करीत होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत स्वतःचा खाजगी स्पिकर महिला नगरसेविकेकडून आणण्यात आला. मात्र, महापाैर नितीन काळजे यांनी हा साऊंड व माईक सभागृहात ठेवण्यास विरोध दर्शविला. दरम्यान, सुरुवातील साने यांनी स्पिकर बाहेर ठेवण्यास नकार दिला, परंतू, महापाैर विनंती सुचना देताच स्पिकर बाहेर काढण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी नियमबाह्य आवाज सभागृहातून बाहेर काढल्याने आवाज घुमला नसल्याचे दिसून आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपाची सत्ता आणली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले. तेव्हापासून महापालिका सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर पर्याय म्हणून विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीचा ‘आवाज’ सभागृहात घुमवण्यासाठी स्वत:चा खाजगी स्पिकर बंद बँगमधून सभागृहात आणला होता. त्याला महापौर नितीन काळजे यांनी विरोध दर्शविला.

यावेळी दत्ता साने म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात गेल्या वर्षभरात विरोधकांना अनेक चांगले-वाईट अनुभव आलेत. विरोधी पक्षातील नगरसेवकांना जाणिवपूर्वक बोलू दिले जात नाही. सत्ताधारी आमचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आम्ही स्वतंत्र स्पिकर सभागृहात आणला आहे. गरज पडेल तेव्हा आम्ही या स्पिकरचा वापर करू.

महापौर काळजे म्हणाले, सभागृहात स्पिकर आणणे हे नियमबाह्य आहे. कुणाचाही आवाज आम्ही दाबत नाही. सभागृहात सर्वांना बोलू दिले जाते. उद्या एखादा नगरसेवक टु व्हिलर घेऊन सभागृहात येईल. त्यामुळे साने यांनी तो स्पिकर सभागृहातून बाहेर पाठवावा. अखेरीस साने यांनी तो स्पिकर सभागृहातून बाहेर पाठवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button