breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये – एकनाथ पवार यांचे आवाहन

पिंपरी – प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा दळवीनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली. या शाळेची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज आहे. त्यामुळे पालकांनी जागेचा अट्टाहास न धरता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून द्यावे, त्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये असे आवाहन सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले.

प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात येणार आहे. तेथील शाळा दळवीनगरला स्थलांतरित करण्यात आली. परंतु, सदरील इमारतीत विद्यार्थ्यांना पाठविण्यास पालकांनी विरोध दर्शवून आंदोलन करत आहेत. त्यावर सभागृह नेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी नवीन शाळेची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक नामदेव ढाके उपस्थित होते.

15 जूनला शाळा सुरु झालेली आहे. महात्मा फुले शाळेत 650 विद्यार्थी येत असताना आता दळवीनगरला केवळ 70 विद्यार्थी येत आहेत. सध्यस्थितीत थेरगाव, चिंचवड स्टेशन, आनंदननगर, वेताळनगर, वाल्हेकरवाडी, दळवीनगर या परिसरातील मुले शिक्षण घेत होते. अनेक पालक देखील आपल्या पाल्याला नवीन शाळेत पाठविण्यास इच्छूक आहेत. परंतु, काही जण त्यांना दमबाजी करतात, असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, दळवीनगर येथील शाळेत अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपुर्ण काळजी घेतली आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान पालिका होऊ देणार नाही. आणखीन आवश्यक त्या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील. पालकांनी सूचना कराव्यात. त्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल. परंतु, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button