breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

उद्योजक रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवयोद्धा फाउंडेशन तर्फे अन्नदान

पुणे : देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावणाऱ्या मंडळींमध्ये एका व्यक्तीचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. हे नाव म्हणजे टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. वयाचा आकडा वाढला असला तरीही या माणसाच्या मनाचं तारुण्य मात्र आजही 16 वर्षांच्या मुलाला लाजवेल असं आहे. सानथोरांमध्ये रमणाऱ्या, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणाऱ्या आणि त्यांच्यासाठी पुढाकारानं अनेक उपक्रम राबवणाऱ्या रतन टाटा यांचा 85 वा वाढदिवस. प्रत्येक क्षेत्रातून, प्रत्येकजण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.

उद्योजक रतन टाटा यांचा ८५ वा वाढदिवसानिमित्त शिवयोद्धा ग्रुप सोशल फाउंडेशन तर्फे सर रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त द पुना स्कुल व होम फॉर द बिल्ड ट्रस्ट, कोरेगाव पार्क, पुणे येथे अन्नदान आणि फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी शिवयोद्धा ग्रुप सोसिअल फाउंडेशनचे चेअरमन गणेश निवृत्ती सस्ते यांच्यासह अनेक सदस्यही उपस्थित होते.

उद्योजक रतन टाटा यांनी भारताला उद्योग क्षेत्रात पुढं घेऊन जाण्यास बरीच मदत केली आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार रतन टाटा यांच्याकडे एकूण संपत्तीची रक्कम सुमारे 3500 कोटी रुपये इतकी आहे. देशातील 433 वे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. इतकी वर्षे उल्लेखनीय कामगिरी करूनही आणि उद्योग क्षेत्रात अनेक विभागांत सक्रिय असूनही टाटा यांची संपत्ती इतकी कमी कशी? हाच प्रश्न तुम्हाला पडतोय ना? तर, समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे हे जाणत टाटा यांनी अनेक समाजोपयोगी कामांमध्ये हातभार लावला, मोठ्या प्रमाणात दान केलं. अनेक धर्मदाय संस्थांना आर्थिक पाठबळ देत रतन टाटा यांनी एक वेगळ्या प्रकारची श्रीमंती जपली आणि हीच श्रीमंती त्यांना सर्वांच्या पुढे ठेवते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button