breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींंपैकी ३२४ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींंपैकी ३२४ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्याचा दावा शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी केला आहे. या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच सरपंच विराजमान होईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुदत संपलेल्या ४७९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, एकूण ४७९ पैकी ३२४ शिवसेना , ५२ राष्ट्रवादी, १४ भाजप, ७५ गाव पॅनल, १ काँँग्रेस, ३ मनसे, ६ महाविकास आघाडी, ३ ग्रामपंचायती इतर पक्षांंना मिळाल्या आहेत, असा दावा ना. सामंत यांनी केला आहे. कोरोना कालावधीत मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या समाधानकारक कामामुळे ग्रामीण भागातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. हे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकातून स्पष्ट झाल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यात ५३ पैकी शिवसेना ४५, भाजप २, गाव पॅनेल ३, इतर पक्षाना ३ ग्रामपंचायती ताब्यात मिळाल्या आहेत. लांजा तालुक्यात २३ पैकी १२ शिवसेना, राष्ट्रवादी २, गाव पॅनेल ९, राजापूर तालुक्यात ५१ पैकी ३५ शिवसेना, राष्ट्रवादी १, भाजप ४, गाव पॅनेल ९, मनसे २, संगमेश्वर तालुक्यात ८१ पैकी ५२ शिवसेना, राष्ट्रवादी ८ , भाजप २, गाव पॅनेल १८, काँग्रेस १, मंडणगड तालुक्यात १५ पैकी ११ शिवसेना, ३ राष्ट्रवादी, १गाव पॅनेल, दापोली तालुक्यात ५७ पैकी ४१ शिवसेना, १३ राष्ट्रवादी , १ भाजप, दोन गाव पॅनेल, चिपळूण तालुक्यात ८३ पैकी ३४ शिवसेना, १३राष्ट्रवादी, १ भाजप, गाव पॅनेल ३०, महाविकास आघाडी ५, गुहागर तालुक्यात २९ पैकी २२ शिवसेना, ४ भाजप, ३ गाव पॅनेल, खेड तालुक्यात ८७ पैकी ७२ शिवसेना, १२ राष्ट्रवादी, मनसे १ , महाविकासआघाडी १असे यश प्राप्त झाले आहे असेही ना. सामंत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button