breaking-newsताज्या घडामोडीपुणे

17 दिवसांनंतर हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाणार पादुका; पंढरपूरला जत्रा नाही

पुणे | संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. दरवर्षी पालखी सोहळ्याला लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. परंतु, यावर्षी कोरोना संक्रमणामुळे केवळ 50 लोकांना दिंडी काढण्याची संधी मिळाली. लॉकडाउनच्या कारणास्तव पालखी केवळ प्रतिकात्मकरित्या मंदिरातून बाहेर निघाली. काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा मंदिर परिसरात परत आणण्यात आली. पालखी सोहळ्यापूर्वी शुक्रवारी महापूजा देखील करण्यात आली. यानंतर इनामदार वाड्याच संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली.

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पालखी 17 दिवसांनंतर देहू येथील तुकाराम महाराज मंदिरातच राहणार आहे. यानंतर शेवटच्या दिवशी तुकारामांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. सामान्य वेळी ही यात्रा 21 दिवसांची असते. यात लोक देहू, आळंदीसह राज्यातील अनेक भागांना सर करत पायी चालत पंढरपूरला येतात. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिंडीचा समारोप होतो. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आपल्या पत्नीसह पंढरपुरात पूजेत सहभागी होतात. आता संक्रमणाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात सहभागी होणार का हे अद्याप स्पष्ट नाही. गेल्या 8 शतकांपासून तुकाराम पालखीची परमपरा सुरू आहे. यात भक्तांची संख्या कमी होण्याची ही 800 वर्षातील तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1912 मध्ये प्लेग या रोगाने आणि 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे या ठिकाणी भक्तांची संख्या कमी झाली होती. 2019 च्या पालखी सोहळ्याला या ठिकाणी जवळपास 5 लाख लोक आणि 350 दिंड्या सहभागी झाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button