breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपळे गुरव येथे गवताला आग, पार्क केलेल्या सहा गाड्या जळून खाक

पिंपरी : पिंपळे गुरव येथील पवनानगर येथे शुक्रवारी (दि. 26 ) सायंकाळी चारच्या सुमारास मोकळ्या जागेत गवताला अचानक आग लागली. या आगीत रस्त्यालगत उभ्या केलेल्या सहा मोटारींना त्याची मोठी झळ बसली.पवनानगर येथे रस्त्याच्या कडेला गवत असून, त्याला शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारींनी पेट घेतला. या आगीत सहा मोटारींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच महापालिका पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी उप अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी आगीवर पाण्याचा फवारा मारून एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा – काँग्रेसला मोठा धक्का! माजी मंत्री नसीम खान यांची स्वपक्षावर टीका, प्रचारालाही नकार

ही कारवाई अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन किरण निकाळजे फायरमन कैलास वाघेरे, भूषण येवले, संतोष कदम, प्रमोद जाधव, सिद्धेश दरवेश, प्रतीक खांडगे, ओंकार शिंदे, शुभम क्षीरसागर, समीर पोटे, ऋषिकेश जगताप, ओंकार रसाळ, संकेत घोगरे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button