breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

मुंबईमध्ये परतू नये म्हणून खासदार संजय राऊत यांची धमकी कंगना रनौत चं ट्वीट

मुंबई: मुंबईमध्ये बॉलिवूड कलाकारांवर टीका आणि आरोपांच्या फैरी झाडणार्‍या कंगना रनौत कडून आज शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेले आहेत. कंगना टीम या तिच्या ट्विटर अकाऊंटवरून संजय राऊत यांनी मला मुंबईमध्ये परत न येण्याची खुली धमकी आहे. मला मुंबई पाकव्याप्त कश्मीर असल्यासारखं का वाटत आहे? असा सवाल देखील तिनं ट्वीट मध्ये विचारलेला आहे.

मात्र पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दरम्यान कोणाला महत्त्व किती द्यायचंय ते पाहावं लागेल. तसेच ड्रग्ज माफियांबद्दल काही पुरावे असतील तर पोलिसांना दयावेत असा सल्ला देखील दिलेला आहे. कंगना रनौत सध्या मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर तिने बॉलिवूडमधील बड्या कलाकारांवर टीका केली होती. नेपोटिझमचे आरोप देखील कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींवर लावले होते. करण जोहर आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मैत्रिपूर्ण संबंध असल्याने त्याला सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अभय मिळत असल्याचेही वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301413968729210880?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1301413968729210880%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fmaharashtra%2Fkangana-ranaut-claims-shiv-sena-mp-sanjay-raut-threatens-her-to-not-enter-mumbai-170239.html

कंगनाने काही दिवसांपूर्वी तिला मुव्ही माफिया पेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत आहे. मला हिमाचल सरकार किंवा केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी पण मुंबई पोलिसांनी नव्हे असं मत देखील ट्वीटर वर दिलेलं होतं. दरम्यान आज मुंबईमध्ये संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळेस त्यांनी मंदिर उघडण्याबाबत ते अगदी राज्यातील अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत सरकारमधील भूमिकेचं स्पष्टीकरण दिलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button