breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जिम आणि हेल्थ क्लब बंद असल्याने सायकलच्या मागणीत वाढ

मुंबई | जुलैपर्यंत जवळपास ३४ लाख सायकली विकल्या आहेत. म्हणजे रोज सुमारे ३७ हजार सायकलींची विक्री झाली. सायकल निर्मात्यांनुसार, जिम आणि हेल्थ क्लब बंद असल्याने सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. स्पोर्ट्‌स, गिअर्ड बाइक्स, किड्स व फॅन्सी बाइक्सच्या मागणीत विशेष वाढ दिसली. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सायकल उत्पादक देश आहे. भारतात दरवर्षी २.२० कोटी सायकलींचे उत्पादन होते. संपूर्ण देशात सायकल उद्योगाशी संबंधित जवळपास ४ हजार युनिट्स आहेत. यातून जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त लोक जोडले आहेत. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक व युनिट्स लुधियानात आहेत.

ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. के.बी. ठाकूर म्हणाले, ५८ वर्षांत मी आतापर्यंतच्या आयुष्यात सायकलच्या मागणीत एवढी तेजी पाहिली नाही. कोरोना काळात सरकारी ऑर्डर बंद असतानाही ही तेजी आहे. जवळपास २५ टक्के विक्री विविध राज्यांच्या सरकारी खरेदीवर अवलंबून असते. महामारीचे संकट संपल्यानंतरही मागणीही सुरू होईल. उद्योग जगतातील जाणकारांनुसार, भारतीय सायकल उद्योग सध्या ५-६ टक्क्यांनी वाढत आहे. मात्र, मागणीत मोठ्या प्रमाणात तेजी आल्याने उद्योगांत २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सायकलच्या प्रथम वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.

सायकल उद्योगासाठी हा सुवर्ण काळ आहे. मागणीबाबत बोलायचे झाल्यास आमच्या २.५ लाख सायकलींची ऑर्डर प्रलंबित आहे. मे महिन्यापासून उद्योग पुन्हा सुरू झाला होता. आम्ही एकटे दरमहा ४ लाखांहून जास्त सायकली तयार करतो. यामध्ये अन्य देशांना होणाऱ्या निर्यातीची संख्या नाही. आगामी महिन्यांत उत्पादन आणखी वाढवू. – पंकज मुंजाल, सीएमडी, हीरो सायकल्स १५ मेपासून सायकलची मागणी दुप्पट झाली. १५-१५ दिवसांची वेटिंग आहे. सामान्य स्थितीत सरकारी ऑर्डरही मिळतील. – ओंकारसिंह पाहवा, एमडी, एवन सायकल्स

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button