breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

केंद्र सरकारचा जनतेला मोठा दिलासा! LPG गॅस सिलिंडर स्वस्त

LPG Gas Cylinder : १ नोव्हेंबर २०२३ रोजी १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १०३ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी घेतला होता. आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्ली ते मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. विशेष म्हणजे ही कपात फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये ५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ घरगुती सिलिंडरची किंमत स्थिर आहे.

हेही वाचा – ‘७० वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं, पण..’; मनोज जरांगे पाटीलांचं मोठं विधान 

कोणत्या शहरात दर किती आहेत?

(शहर जुनी किंमत नवीन किंमत)

  • दिल्ली : १८३३ रुपये, १७५५.५० रुपये
  • मुंबई : १७८५.५० रुपये, १७२८ रुपये
  • चेन्नई : १९९९.५० रुपये, १९४२ रुपये
  • कोलकाता : १९४३ रुपये, १८८५.५० रुपये

घरगुती सिलेंडरची किंमत

  • दिल्लीत : ९०३ रुपये
  • मुंबई : ९०२.५० रुपये
  • चेन्नई : ९१८.५० रुपये
  • कोलकाता : ९२९ रुपये
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button