breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिला पाहूण्यांचा ‘विशेष आकर्षण’ उल्लेख करणा-या अधिका-यांवर कारवाई करा

महापाैर उषा ढोरे यांना पत्र; वुमेन हेल्पलाईन फाउंडेशनच्या निता परदेशी यांची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पवनाथडी जत्रेचे उद्घाटन अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांचे हस्ते करण्यात आले. मात्र, महापालिकेने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेच्या जाहिरातीवर त्यांचा प्रमुख आकर्षण असा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे समस्त महिला वर्गाचा अपमान झाला असून महिलांविषयी विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणारा आहे. या प्रकरणी संबंधित अधिका-याने महिला वर्गाची माफी मागावी, तसेच दोषीवर कडक कारवाई करा, अशी मागणी वुमेन हेल्पलाईन फाउंडेशनच्या निता परदेशी यांनी केली आहे.

महापाैर उषा ढोरे यांना हे पत्र दिले आहे. त्यात म्हटले की, पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिका-याकडून अशी चुक होणे अक्षम्य आहे. चित्रपट, नाटक व व्यावसायिक संस्था एखाद्या अभिनेत्रीचा उल्लेख विशेष आकर्षण म्हणून करणे चुकीचे आहे. यामुळे या प्रकरणी महापालिकेच्या वतीने संबंधित अभिनेत्री व समस्त महिला वर्गाची बिनशर्त जाहीर माफी मागावी, संपुर्ण प्रकाराची चाैकशी करुन संबंधित दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वुमेन हेल्पलाईन फाउंडेशनने केली आहे.

तसेच संबंधितावर सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास विमेन हेल्पलाईनच्या वतीने महापालिका भवनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. यापुढे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे महिलांचा अपमान होईल, असा कोणताही उल्लेख होणार नाही. यांची दक्षता घेवून प्रशासनाला लेखी आदेश द्यावेत, असेही महापाैरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button