breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या 66 कर्मचा-यांना मिळाली बढती

पिंपरी  ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे. चतुर्थ श्रेणी वर्गात काम करीत असलेल्या एकूण 57 जणांना लिपिक म्हणून पदोन्नती दिली आहे. तर, एकास लेखापाल व 8 जणांना उपलेखापाल म्हणून पदोन्नती दिली आहे, या संदर्भातील आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील  ‘ड’ वर्गातील पात्र ठरलेल्या कर्मचार्‍यांना लिपिक म्हणून पदोन्नती दिली आहे. त्यांनी टंकलेखनाची परीक्षा दिली आहे. असा एकूण 57 जणांना पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये प्रकाश सदाफुले, सोमनाथ देवीकर, राजू तापकीर, अमर निकाळजे, सुनील जाधव, माधवी चौगुले, राजू खरात, गीता यादव, प्रदीप गायकवाड, वैभव ठाकर, उमेश जगताप, अशुतोष हरनोळ, आनंद जाधव, विद्या कावडे, अपर्णा सुकेणकर, सुषमा बडगुजर, राधिका पिंगळे, अस्मिता महाडिक, जयश्री भागवत, स्वाती ननावरे, यमुना गिते, सुवर्णा शिवशरण, सुनंदा वाबळे, सुप्रिया नंदकर, योगिता जाधव, स्वाती गुल्हाने, घनशाम सत्यजीत, रेश्मा भांडेकर, रोहित पंचमुख, अभिजीत कुचेकर, अश्‍विनी गंभीरे, नीलेश निगडे, राहुल पाचारणे, विलास केलगंद्रे, बाळासाहेब तोंडे, रोहित कुडले, सुप्रिया सुरगुडे, अभिजीत काळभोर, कविता गढरी, गणेश कहाणे, स्वाती मोटे, उमेश कुटे, निकीता जाधव, अशोक क्षिरसागर, अशोक गजे, सागर शिंदे, दत्तात्रय कोळसे, माया पाटील, राणी धांडे, संदीप बेल्हेकर, राजश्री गावडे, सोनाली बेलवटे, अमित आखतकर, प्रीतम हाडोळे, नितीन ठाकर, विवेक खांदेवाड, सुभाष पोतदार यांचा समावेश आहे.

तसेच सत्तार पठाण यांची लेखापालपदी आणि बाळू कापसे, तानाजी सावंत, दारासिंग मन्हास, अलका लोंढे, सिद्धार्थ जगताप, शिवाजी गराडे, राजेंद्र धाकडे, सुरेखा साळुंके या 8 जणांना उपलेखापाल म्हणून पदोन्नती दिली आहे. उपअभियंता केशवकुमार फुटाणे यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती दिली गेली आहे. तर बापू लिम्हण व मुरलीधर लोंढे यांची सुरक्षा सुपरवाझर म्हणून पदोन्नती मिळाली आहे. तर, रामू जगताप यांना मुकादम म्हणून बढती दिली आहे. पदोन्नती झालेल्या अधिकार्‍यांना पदानुसार वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button