breaking-newsराष्ट्रिय

मदरशात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तिघे अटकेत

मालेगाव शहरातल्या मदरशामध्ये मुलींच्या मदरशात एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदरशाच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे मालेगावात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या आईला एका महिलेने मदरशात तुमच्या मुलीला शिक्षणासाठी पाठवा असा सल्ला दिला होता. पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलगी मदरशात दाखल झाली होती.

दरम्यान घराच्या स्वच्छतेच्या कामासाठी या मुलीला बोलवून तिला गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या मुलीला नाशिकच्या बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मदरशाच्या मुख्य व्यवस्थापकासह त्याची पत्नी आणि एक महिला कर्मचारी अशा तिघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात दाखल केलं असता पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button