breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

विजय हजारे करंडकासाठी मुंबई संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधारपदी

 

मुंबई – बीसीसीआयने आगामी विजय हजारे करंडक 2021साठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार 20 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत एकूण 23 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. तर 14 मार्चला अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. एकूण 38 टीम विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. आता विजय हजारे करंडकासाठी मुंबई संघाची घोषणा झाली आहे. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरकडे मुंबई संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जून तेंडुलकरचा मुंबईच्या संघात समावेश होऊ शकलेला नाही.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर खेळू शकला नव्हता. आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करण्यास सो सज्ज झाला आहे. श्रेयसबरोबर तडाखेबाज फलंदाज पृथ्वी शॉ याला मुंबईचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीला येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. ही टूर्नामेंट कोलकाता, सूरत, तमिळनाडू, जयपुर, बँगलोर आणि इंदौर या सहा ठिकाणी खेळवण्यात येईल.

विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईची टीम : श्रेयस अय्यर (कप्तान), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, अखिल हेरवाडकर, सरफराज खान, चिन्मय शंकर, आदित्य तारे, हार्दिक तामोर, शिवम दूबे, आकाश पारकर, आतिफ अटवाल, आतिफ अटवाल अंकोलेकर, साईराज पाटील, सुजित नायक, तनुश कोटियन, प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राउत आणि मोहित अवस्थी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button