breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरमधील हीरानगर सेक्टरच्या पानसरमध्ये आणखी एक बोगदा आढळला

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील हीरानगर सेक्टरमधील (भारत- पाकिस्तान सीमेवर ) पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ ) जवानांनी एक बोगदा शोधून काढला. या बोगद्याची लांबी १५० मीटर लांब असून दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाने या बोगद्याची निर्मिती केली होती.10 दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा आहे.
आतापर्यंत जम्मू परिसरात दहाव्यांदा आणि मागील सहा महिन्यांमध्ये चौथ्यांदा बोगदा आढळून आला आहे.बीएसएफने जून २०२० मध्ये याच भागात शस्त्र आणि स्फोटकं घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेक्साकॉप्टरला पाडले होते. जवानांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्न देखील हाणून पाडला होता. याअगोदर देखील बीएसएफला ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात २५ फूट खोल व १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला होता. विशेष म्हणजे, या भूयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही तिथं सापडल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button