breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: सत्कर्म सोशल फाउंडेशन,मातृभूमी प्रतिष्ठान व गणेश जवळकर मित्र परिवार यांच्या वतीने गोरगरिबांना दैनंदिन उपयोगातील वस्तूंचे वाटप

कासारवाडी। प्रतिनिधी।

आपल्या भारतावर कोरोनाचे संकट ओढावलेले आहे, अशा वेळी या संकटाशी दोन हात करताना आपल्याकडून समाजाची मदत व्हावी या हेतूने आज सत्कर्म सोशल फाउंडेशन व गणेश जवळकर मित्र परिवार यांच्या वतीने हातावर पोट असणाऱ्या गरीब व गरजू लोकांसाठी सुरू केलेल्या मातृभूमी प्रतिष्ठान अन्नछत्र सेवेस मदतीचा खारीचा वाटा देण्यात आला.

तसेच, यांनी समाजास आव्हान केले आहे की, या लोकांसाठी जेवढी शक्य होईल तेवढी मदत जरुर करावी, आणि घरी राहून कोरोनावर मात करावी.

महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 193 वर

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचं थैमान सुरुच आहे. लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर पोहचला आहे. आज मुंबईत 4, जळगावमध्ये 1, सांगली 1, नागपूर 1 असे रुग्ण सापडले. यामुळे आरोग्य यंत्रणांच्या काळजीत वाढ झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता राज्यसरकारने खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 77
पुणे – 24
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर – 12
कल्याण – 7
ठाणे – 5
नवी मुंबई – 6
यवतमाळ – 4 (यवतमाळ येथील 3 रुग्ण चाचणी निगेटीव्ह )
अहमदनगर – 3
सातारा – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
वसई विरार – 4
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
पुणे ग्रामीण- 1
पालघर- 1
जळगाव- 1
इतर राज्य (गुजरात) – 01
एकूण 193

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button