पुण्यात पार्किंगमध्ये 11 वाहने जळून खाक, कोणी लावली आग?
पुणे | महाईन्यूज |प्रतिनिधी
पुण्यातील पर्वती पायथा येथील एका इमारतीच्या पार्किंगमधील 11 वाहनांना आग लावल्याची घटना घडली आहे. यात वाहने जळून खाक झाली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा, सानेगुरुजी शाळेसमोर असणार्या एका इमारतीच्या पार्किंगमधे आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास 11 गाङ्यांना आग लावल्याची घटना घडली. या आगीत 6 दुचाकी, 1 रिक्षा पुर्ण जळाल्या असून 4 दुचाकींना झळ बसली आहे. ज्या व्यक्तीने ही आग लावली, त्याचा शोध सुरू असल्याचे दत्तवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पर्वती पायथा या ठिकाणी असलेल्या सानेगुरुजी शाळेसमोरच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला आहे. या आगीत सहा दुचाकी 1 रिक्षा जळून खाक झाली आहे. तर इतर 4 दुचाकींनाही याची झळ बसली आहे. याआधीही पुण्यात असे प्रकार घडले आहेत. आता पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.