breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

“सर्व मराठी बंधू भगिनींना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा गौरव दिनावर बोलताना सर्व मराठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जगातील सर्वात जुनी भाषा म्हणून तमिळ, तर जगातील सर्वात बोलल्या जाणाऱ्या भाषेंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिंदीचाही गौरव केलाय. यावेळी त्यांनी मातृभाषा आईप्रमाणे आपलं जीवन घडवते असं मत व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी आपण मातृभाषा दिन साजरा केला. यातील तज्ज्ञ लोक मातृभाषा शब्द कोठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली याबाबत अधिक माहिती देऊ शकतात. जशी आपली आई आपलं आयुष्य घडवते, तशीच मातृभाषा आपलं जीवन घडवते. भारतात जगातील सर्वात जुनी भाषा असलेली तमिळ भाषा आहे. २०१९ मध्ये हिंदी जगातील सर्वाधित बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button