breaking-newsआंतरराष्टीय

मास्क बंदी झुगारून हाँगकाँगमध्ये हिंसाचार

हाँगकाँग :- हाँगकाँगमध्ये शनिवारी शहरातील सर्व व्यवहार चीनविरोधी आंदोलनामुळे थंडावले असून  निदर्शकांना मास्क वापरण्यास बंदी केल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. दुकाने व मॉल रात्रभर हिंसाचार सुरू राहिल्याने बंद ठेवण्यात आले.  शेकडो निदर्शकांनी पुन्हा मास्क घालून आंदोलन केले. मोर्चाला परवानगी नसताना कॉजवे बे या शॉपिंगसाठी प्रसिद्ध जिल्ह्य़ात हिंसाचार करण्यात आला. गेली पन्नास वर्षे न वापरलेल्या आपत्कालीन कायद्याचा वापर या वेळी पोलिसांना करावा लागला. निदर्शकांनी अनेक ठिकाणी दुकानांमध्ये लुटालूट केली. आगी लावल्या व रस्तेही रोखून धरले. शनिवारी जमाव चाल करून जात असताना शहराच्या चीन समर्थित नेत्या कॅरी लॅम यांचे एक निवेदन चित्रफितीच्या रूपात जारी करण्यात आले, त्यात त्यांनी निदर्शकांनी हिंसाचार केल्याने काळी रात्र असल्याचे सांगून निषेध व्यक्त केला. हाँगकाँगची आणखी हानी होऊ देणार नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, की नागरिकांनी कट्टर निदर्शकांपासून दूर रहावे. कॉजवे बे येथील मोर्चात निदर्शकांनी मास्क बंदीचा निर्बंध मोडीत काढला. गेले चार महिने हाँगकाँगमध्ये हिंसाचाराचा आगडोंब  सुरू  आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button