breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत वाहनांची तोडफोड करुन टोळक्यांनी माजवली दहशत

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने सात ते आठ वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरीतील संजय गांधीनगर परिसरात सोमवारी(ता.13) घडली.

रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने आरडाओरडा करीत लाकडी दांडक्याने अचानक वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या वाहनांध्ये रिक्षा, दुचाकी व मोटारीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत टोळके पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button