breaking-newsमुंबई

शरद पवारांनी सहकुटुंब घेतले वर्षावरील बाप्पाचे दर्शन

मुंबई – गेले अकरा दिवस भक्तीभावे पूजा केल्यानंतर आज (अनंत चतुर्दशी) गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देणार आहेत. चतुर्दशीच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर दरवर्षी गणरायाचे आगमन होते. मुख्यमंत्र्यांनी गणरायाची सपत्नीक पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी वर्षावर गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा केली. काल शरद पवार यांनी या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, नात आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, वरुण सरदेसाई आदी मान्यवरही हजर होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शनानंतरचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button