breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेरीवाल्यांना कोरोना नकारात्मक प्रमाणपत्राचे वाटप

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनासह नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ सतत प्रयत्नशील आहे. भाजीविक्रेते, फळविक्रेते, चहा, वडापाव सह इतर विक्रेत्यांकडून ग्राहकांना आणि नागरिकांना कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, याबाबत खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत फेरीवाल्यांची तपासणी करून त्यांना covid-१९ नकारात्मक प्रमाणपत्राचे वितरण महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या हस्ते वितरण करण्यात आले .

यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी,प्रदेश संघटक अनिल बारावकर, सुरज देशमाने, तुकाराम माने, प्रकाश साळवे, शामलाल सोळंकी , उमेश डोर्ले, राजेश माने, बालाजी लोखंडे, रफिक शेख , यासिन शेख , सुरेश देडे आदी उपस्थित होते .

फळे, भाजीपाला आणि दूध विक्रेते, चहा वडापाव व इतर विक्रेते यांच्याकडे ग्राहक येण्याची आकडेवारी मोठ्या प्रमाणात आहे. फेरीवाल्यांना कोरोनाची बाधा असेल तर त्यांच्यामुळे इतर ग्राहकांना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या सहकार्याने विक्रेत्यांची तपासणी सुरू केली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत बाराशेहून अधिक विक्रेत्यांनी तपासणी करून घेतली आहे. त्यातील नकारात्मक प्रमाणपत्र हे विक्री करत असणाऱ्या जागेवरती हातगाडीवर ठेवून तपासणी करता आलेल्या संबंधित अधिकारी आणि ग्राहकाना मी करोना नकारात्मक असल्याचे दाखवण्यात येणार आहे. यामुळे सर्व विक्रेते, ग्राहक यांच्यात सकारात्मक वातावरण तयार होऊन नागरिकांना निसंकोच फेरीवाल्याकडुंन खरेदी करता येणार आहे. आमचे रक्षणासह ग्राहकाचे रक्षण करण्यास फेरीवाला आता सज्ज झाला असून सुरक्षित अंतर, हातमोजे, मुखपट्टी, वांरवार हात धूणे आदी काळजी घ्यावी, असे अवाहन महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यानी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button