breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधानांच्या वास्तव्याने केदारनाथ ध्यानगुंफेच्या लोकप्रियतेत वाढ

निवडणूक निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात केदारनाथ येथील ज्या गुंफेत ध्यानधारणा केली होती त्या गुंफेची लोकप्रियता अचानक वाढली असून अनेक भक्तगणांनी गढवाल मंडल विकास निगम लि. (जीएमव्हीएन) या संस्थेच्या बुकिंग सेवेत जाऊन ऑनलाइन नोंदणी केली आहे. ध्यानगुंफेचे बुकिंग वाढले असून संपूर्ण जुलै महिन्यातील आगाऊ बुकिंग पूर्ण झाले आहे. अगदी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरच्याही अनेक तारखा संपल्या आहेत, असे या संस्थेचे व्यवस्थापक बी.एल. राणा यांनी सांगितले.

देशाच्या विविध भागातील लोक जीएमव्हीएनच्या संकेतस्थळावर जाऊन ध्यानगुंफेचे बुकिंग करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मे महिन्यात या गुंफेत ध्यानधारणा केल्यानंतर ही ध्यानगुंफा नंतर रिकामी राहिलेली नाही. या गुंफेची लोकप्रियता वाढत आहे. गढवाल हिमालयात १२५०० फूट उंचीवर ही गुंफा असून आता या गुंफेची लोकप्रियता वाढल्याने अशा तीन ध्यानगुंफा तेथे तयार करण्यात येणार आहेत, असे रूद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मंगेश घिलडियाल यांनी सांगितले. सध्या जी ध्यानगुंफा आहे त्याच्याच जवळ आणखी तीन गुंफा बांधण्यात येणार आहेत. एका गुंफेचे काम सुरूही झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button