breaking-newsआंतरराष्टीय

इंटरनेटचा दहशतवादासाठी होणारा वापर रोखणार!

‘जी-२०’ देशांचा निर्धार

दहशतवादी कारवायांसाठी इंटरनेटचा होत असलेला वापर रोखण्याचा निर्धार ‘जी-२०’ देशांच्या ओसाका येथील बैठकीत शनिवारी करण्यात आला. इंटरनेट सेवा मुक्त, खुली व सुरक्षित असावी हे जरी खरे असले तरी त्याचा वापर दहशतवादासाठी होता कामा नये.  लोकांना दहशतवाद्यांच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कुठल्याही देशाच्या नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असते. ती जबाबदारी त्या त्या सरकारची आहे. त्याचाच एक भाग म्हणून दहशतवादासाठी इंटरनेटचा वापर होऊ न देण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत, असे जपानमधील ओसाका येथे जी-२० देशांच्या शिखर बैठकीच्या समाप्तीवेळी जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

जी २० देशांच्या नेत्यांनी म्हटले आहे,की न्यूझीलंडमध्ये ख्राइस्ट चर्च येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, त्यात ५१ लोकांचा बळी गेला. इतरही काही घटनात इंटरनेटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादासाठी इंटरनेटचा होणारा वापर रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र दहशतवाद विरोधी धोरणांची अंमलबजावणी करण्यात येईल. दहशतवादाचा मुकाबला करताना मूलभूत स्वातंत्र्याचा मान राखला गेला पाहिजे. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माहितीचे स्वातंत्र्य यांचा समावेश आहे. ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी हॅम्बर्ग येथे पूर्वीच ठरवण्यात आलेल्या तत्त्वांचे पालन करण्याची गरज आहे.

आर्थिक कृती दलाची (एफएटीएफ) तत्त्वे आभासी मालमत्ता व दहशतवादाला काळा पैसा पुरवणाऱ्यांना लागू करण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला . दहशतवादाचा अर्थपुरवठा रोखण्यासाठी एफएटीएफची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या सुरक्षा मंडळाच्या ठराव क्रमांक २४६२ चे यात स्वागत करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button