breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लोणावळ्यात पंक्चर झालेला टायर बदलताना अपघात; तीन ठार, २५ जखमी

पिंपरी – मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगदा व पवना पोलिस चौकीजवळ आज पहाटे झालेल्या बसच्या अपघातात तीन ठार, २५ जण जखमी झाले आहेत. तर, तीनजण गंभीर जखमी झाले आहे.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या शोल्डर लेनवर पंक्चर झालेला ट्रक उभा होता. त्यावेळी टायर बदलला जात असताना मागून आलेल्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकवर धडकला. या बसची धडक एवढी जोरदार होती की, बसमध्ये प्रवास करणारे तिघेजण तीन प्रवासी जागीच ठार झालेत. इतर प्रवाशांना उपचारासाठी पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त मतदानासाठी आपल्या गावी जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मागील काही दिवसांमध्ये अशा प्रकरच्या अपघातात वाढ झाली आहे. टायर पंक्चर झाल्यानंतर टायर बदलताना काहींचे अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बावधनजवळ एसटीच्या चालक-वाहकाचा टायर बदलताना अपघाती मृत्यू झाला होता. तर इतर काही प्रवासी जखमी झाले होते.

शोल्डर लेनवर बंद पडलेले वाहन असणार असे गृहीत धरून चालकाने वाहन चालवले पाहिजे. मात्र, तरीदेखील शोल्डरलेनवरून बस किंवा छोटी वाहने सर्रासपणे वाहने ओव्हरटेक करताना दिसत आहेत. एक्स्प्रेवेवरील याप्रकारच्या अपघातामुळे वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती असण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button