breaking-newsराष्ट्रिय

गुजरातमध्ये काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश

सुरत : गुजरातमधील काँग्रेस नेते कुवरजी बवालिया यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी हे मतांसाठी जातीय राजकारण करत असल्याची टीका करत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

कुवरजी बवालिया यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे राजीनामा सोपवल्यानंतर बवालिया हे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. बवालिया हे चार वेळा आमदार राहिले असून सध्या ते राजकोट जिल्ह्यातील जसदान मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ मध्ये ते लोकसभेवरही निवडून गेले होते. बवालिया हे गुजरातमधील कोळी समाजातील नेते असून गुजरातच्या ६ कोटींच्या लोकसंख्येत कोळी समाजाचे प्रमाण २२ टक्के आहे. या समाजात बवालिया यांचा दबदबा आहे.

बवालिया यांनी १५ दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामकाजाविरोधात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. मात्र, यानंतर पक्षाकडून बवालिया यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. ‘राहुल गांधी हे मतांसाठी जातीय राजकारण करतात. यामुळे मला मतदारसंघात काम करणे अशक्य झाले. माझा नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर विश्वास असून तेच देशाचा विकास करतील, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button