breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

पंढरपुरची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची : उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे भाजपाची ‘हवा टाईट’

पंढरपुर । प्रतिनिधी

पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्या मुळे चांगलेच राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल ( 8 एप्रिल ) दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर रात्री पंढरपूरमध्ये काही राजकीय गोळाबेरीज करणाऱ्या भेटी घेतल्या. या भेटींमुळे भाजपाची हवा टाईट झाली असून अजित पवार यांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे यावरुन दिसून आले. अजित पवारांच्या रात्रीच्या भेटीगाठीं मुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आणि भारतीय जनता पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काल शेवटची सभा संपवून अजित पवार हे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना घेऊन पहिल्यांदा धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. इथे धनगर समाजाच्या अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. हा भाजपला पसंती देणारा मतदार अशी ओळख असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी तुमच्या मागण्या पूर्ण करुन तुमच्या मागे उभे राहिल, असं सांगत त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनसेचे राज्य समन्वयक आणि रॉडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जात त्यांनी मनसैनिकांशी चर्चा केली . यावेळी मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याची दुसरी खेळी अजित पवार यांनी केली.

अजित पवार यांनी आपला मोर्चा थेट परिचारक गटाच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे वळवला. साधना भोसले यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आणि चर्चा केल्याने भाजपाला घाम फुटला. साधना भोसले या भाजपच्या चिन्हावर पंढरपूरच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. एकंदर अजित पवार आता आपले सर्व फंडे या निवडणुकीत बाहेर काढत असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली आहे . या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत. आज ( 9 एप्रिल ) दिवसभर अशाच पद्धतीने अजित पवार मंगळवेढ्यात प्रचार आणि भेटीगाठी करणार असल्याने भाजपाची चिंता वाढली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button