breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

डॉ. अमोल कोल्हेंना राज्यात मोल…!

खासदार डॉ. अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीकडून शिरुर लोकसभा मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८ हजार मतांनी डॉ. कोल्हे यांनी पराभव केला. त्यावेळी संपूर्ण शिरुर लोकसभा मतदारसंघात केवळ एक आमदार पक्षाचा सोबत असताना हा विजय मिळविण्यात डॉ. कोल्हे यशस्वी झाले. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला. महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘शिवस्वराज्य यात्रा’ च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या यात्रेमुळे घवघवीत यश मिळविण्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सिंहाचा वाटा उचलला.

डॉ. अमोल कोल्हे लोकसभेचे स्वतः उमेदवार आहेत, असं असताना देखील राज्यातील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाट्याला भाजपने लोकसभेच्या ४ जागा दिल्या आहेत. परंतु अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात अडकून पडले आहेत, इतर मतदारसंघात प्रचाराला जायला त्यांना शक्य होत नसल्याचे दिसत आहे. मात्र दुसरीकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला तर जातच आहेत, परंतु महाविकास आघाडीतील इतर पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला देखील राज्यात फिरत आहेत. याशिवाय डॉ. अमोल कोल्हे स्वतः लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणिसंभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या नव्हे नव्हे तर ती भूमिका जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. कोल्हे यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. त्यांच्या आचरणात असलेली निष्ठा, स्वाभिमान यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांना मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांकडून डॉ. कोल्हे यांची एखादीतरी सभा मिळावी यासाठी चढाओढ सुरू आहे. डॉ. कोल्हे स्वतः उमेदवार असूनही अर्धा दिवस मतदारसंघात प्रचार करून माढा, सातारा, कोल्हापूर, बारामती या मतदारसंघात सभा घेऊन पुन्हा स्वतःच्या मतदारसंघातील प्रचारदौऱ्यात हजर असतात.

हेही वाचा    –      ‘काँग्रेस राजवटीत १०० पैकी १५ रुपयांचा निधीच लोकांपर्यंत पोहोचायचा’; चित्रा वाघ

बुधवार (दि. १) रोजी मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा करून गुरुवारी (दि.२) सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरने साताऱ्यात जाऊन पाचवड येथे शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन पुढे पुन्हा करहर येथे सभेला हजेरी लावली. तर दुपारनंतर हेलिकॉप्टरने म्हसवडला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन रात्री पुन्हा रहिमतपूर येथील सभा गाजवून रात्री मतदारसंघात हजर झाले. एका दिवसात बाहेरच्या मतदारसंघात ४ सभा करून एवढ्यावरच न थांबता शुक्रवारी (दि.३) सकाळी शिरुर- हवेली मतदारसंघात शिरूरच्या पूर्व भागातील गावांचा गावभेट दौरा करून सायंकाळी पुन्हा कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराला हेलिकॉप्टरने प्रयाण केले. रात्री उशिरा कोल्हापूरची सभा आटोपून पुन्हा शनिवारी (दि. ४ ) सकाळी मतदारसंघातील आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघातील गावांचा गावभेट दौरा पूर्ण केला. रविवारी (दि. ०५) रोजी सकाळी पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दिवसभर सभा, रॅली एवढंच नाही तर, सायंकाळी नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथील जाहीर सभेत देखील डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली.

स्वतःच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि मावळ, बारामती, माढा, कोल्हापूर, सातारा, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील डॉ. अमोल कोल्हे यांचा करिष्मा पहायला मिळाला आहे.

दरम्यान कोणत्याही पक्षाचे अध्यक्ष नसताना, कोणत्याही मोठ्या राजकीय कुटुंबात जन्म न घेता, स्वतःचा मतदारसंघ सांभाळून राज्यातील इतर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला फिरणारे उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांची इतिहासात नोंद होणार हे मात्र नक्की.

या सगळ्या धावपळीत भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी डॉ. कोल्हे यांना एका हॉटेलमध्ये योगायोगाने भेटले. त्यांनी विचारलं “बाबा रे तुझ्या मतदारसंघात मतदान पार पडलं का.?” त्यावर डॉ. कोल्हे म्हणले “अजून नाही येत्या १३ तारखेला आहे” त्यावर गडकरी आश्चर्यचकित झाले आणि खाली वर पाहू लागले, आणि म्हणाले “तुझं मतदान अजून झालं नाही तरीही तू इतर मतदार संघात फिरतोय?” यावर डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, माझा माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. संसदेत माझ्या व्यवसायासाठी नाही तर माझ्या मतदारसंघातील बळीराजासाठी भांडलोय त्यामुळे माझी मायबाप जनता मला भरघोस मतांनी निवडून देईल. राजकारणात ३०-३५ वर्षे निवडून येणाऱ्या नेत्यांना देखील एवढा विश्वास जनतेचा मिळवता आला नाही, मात्र डॉ. कोल्हे यांनी मतदारसंघातील जनतेचा विश्वास मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय सुखकर होणार एवढं मात्र नक्की.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button