breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘आकुर्डी परिसरात महाविकास आघाडी प्रचार व नियोजनात पुढे’; उषा संजोग वाघेरे

पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत गाठी-भेटी घेत केला प्रचार

आकुर्डी | प्रतिनिधी

आकुर्डीत परिसरात महाविकास आघाडी नियोजन आणि प्रचारामध्ये आघाडीवर आहे. आघाडीचे घटक पक्ष, संजोग वाघेरे पाटील यांचा मित्र परिवार आणि सर्व कार्यकर्ते एकदिलाने व एकजुटीने काम करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा विजय मावळ लोकसभेसाठी परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास उषा संजोग वाघेरे पाटील यांनी आकुर्डीत प्रचार दौरा सुरू असताना व्यक्त केला.

आकुर्डी प्रभागातील दत्तवाडी विठ्ठलवाडी, विवेकनगर, तुळजाई वस्ती, श्रीकृष्ण नगर, क्रांतीनगर, एकता नगर, साई दर्शन नगर, लाल बहाद्दूर शास्त्री नगर, सह्याद्री कॉलनी आकुर्डी गावठाण, पंचतारांनगर, गुरुदेवनगर, गंगानगर भागात उषा संजोग वाघेरे यांनी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, तसेच संजोग वाघेरे पाटील यांचा चाहता वर्ग यांच्यासोबत मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या.

हेही वाचा    –    गोविंदा यांच्या ‘रोड शो’ला पिंपरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

या वेळी माजी नगरसेवक गोपाळ कुटे, माजी नगरसेविका सविता वायकर, सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद, गिरीश कुटे, किशोर जोशी, भाविक देशमुख, प्रदीप महाजन, विकास भिसे, अमोल बोमले, सागर लक्षरे, आण्णा कु-हाडे, वसंत सोनार, यशवंत भालेराव, ज्ञानेश्वर ननावरे, रविराज गडगे, रिषेकेश घोरपडे, शंतनू पांढरकर, संतोष कवडे, यशवन्त तरळ, निखिल दळवी, इरफान मुजावर, श्रीमंत जगताप, वरूण काळभोर, बंटी काळभोर, विनायक काळभोर, रामभाऊ दातीर, अभिनव वायकर, बुवा शिंदे, ज्योती वायकर, नितीन कदम, सागर कदम, चेतन धुधाळ, शैलेश भोसले, महेश पानस्कर, पंकज पाटील, महेश ताकवले, अमित जायगुडे, सुजित नानेकर, आकाश वाघेरे, सुनील मोरे, जिब्राईल शेख, सचिन उबाळे, दांगट ताई, लांडे पाटील ताई, सारिका पोटफोडे, सोनाली जाधव, सुनीता वाघेरे, ज्योती वाघेरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. मात्र,, विजय आपलाच आहे, असे समजून गाफील राहून देखील आपल्याला चालणार नाही. आकुर्डी भागात सर्व घटक पक्षाची एकजूट पाहता संपूर्ण पिंपरी विधानसभेमध्ये आकुर्डी भागात आपल्याला भरपूर आघाडी मिळेल, असाही विश्वास देखील यावेळी उषा वाघेरे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button