Uncategorized

गांधीजींनी आत्महत्या कशी केली?

महात्मा गांधी यांनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारून गुजरातमधील एका शाळेने खळबळ उडवली असून गुजरातच्या शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

आणखी एका अशाच प्रश्नामुळे गुजरातच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. गुजरात राज्यात दारुबंदी असताना दारू गाळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता.

गांधीजींनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न गांधीनगरमधील सुफलम शाळा विकास संकुलातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका

खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाने शिक्षण अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे.

सुफलम शाळा विकास संकुल ही संस्था काही शाळा आणि शैक्षणिक संस्था चालवते. या संस्थेला गुजरात सरकार अनुदानही देते. शाळेतील शिक्षकांनी विचारलेल्या या विचित्र प्रश्नप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन्ही प्रश्न अतिशय आक्षेपार्ह असून या प्रकाराची आम्ही चौकशी सुरू केली आहे. अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे गांधीनगर जिल्ह्य़ाचे शिक्षण अधिकारी भारत वधेर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button