TOP NewsUncategorizedक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघातील क्रिकेटपटूने स्वत:च्याच बर्थ डे पार्टीत प्रेयसीला केलं प्रपोज; Marry Me म्हणत साखरपुडाही उरकला

भारताचा डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने आपल्या प्रेयसीसोबत साखरपुडा केलाय. अक्षरने स्वत: इन्स्टाग्रामवरुन प्रेयसी मेहासोबतच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदवार्ता दिलीय.गुरुवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी अक्षरचा २८ वा वाढदिवस होता. त्यामुळेच त्याने साखरपुड्यासाठी हाच मुहूर्त निवडला. अक्षरने इन्स्टाग्रामवर या सोहळ्याचे चार फोटो शेअऱ केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांबरोबरच अक्षरचे भारतीय क्रिकेट संघातील सहकारी सुद्धा त्याला शुभेच्छा देत असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे.

अक्षरने मेहासोबतच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताना सुंदर कॅप्शन लिहिली आहे. “ही आयुष्याची नवीन सुरुवात आहे. आम्ही आता कायमचे एक झालो आहोत. मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन असा शब्द देतो,” अशी कॅप्शन अक्षरने दिलीय. अक्षरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो प्रेयसी मेहासोबत दिसत असून ते एकमेकांना अंगठ्या घालताना दिसत आहेत. अक्षरने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यानच मेहाला प्रपोज करुन रिंग सेरिमनी करण्यासंदर्भातील नियोजन केलं होतं. अक्षरच्या फोटोंवरुन तर हे मेहासाठीसुद्धा सप्राइज होतं असं वाटतंय.

या फोटोंमध्ये अक्षर आणि मेहा एकमेकांना रिंग घालत असताना मागे मॅरी मी म्हणजेच माझ्याशी लग्न कर असा मजूर असलेला बोर्ड दिसत आहे. म्हणजेच अक्षरने मेहाला सप्राइज देण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं.

अक्षरने हे फोटो शेअर केल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. यामध्ये ऋषभ पंत, उमेश यादव आणि ईशान किशनसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. जयदेव उनाडकटने गुजराती भाषेत अक्षरला शुभेच्छा दिल्यात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button