ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

लोकप्रिय अभिनेता क्षितिज झारापकरचे निधन

कॅन्सरशी झुंज अपयशी, कार्डियाक अरेस्टमुळे गमावला जीव

मुंबईः क्षितिज त्यांच्या पार्थिवावर दुपारी साडेतीन वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमी याठिकाणी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. क्षितिज यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

क्षितिज झारापकर यांच्या कामाबद्दल…
क्षितिज यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी ‘टूर टूर’, ‘काळा वजीर पांढरा राजा’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘सख्खे शेजारी’, ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. ‘लाखात मी देखणी’, ‘सख्या सजणा’ या नाटकांच्या लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. अलीकडेच ते आस्ताद काळे आणि आदिती सारंगधर यांच्यासोबत ‘चर्चा तर होणारच’ या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

झारापकर ‘गोळाबेरीज’, ‘ठेंगा’, ‘एकुलती एक’, ‘आयडियाची कल्पना’, ‘बालगंधर्व’, ‘इश्श्य’ या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या घेटीला आले आहेत. याशिवाय ‘इश्श्य’, ‘करूया उद्याची बात’, ‘आयडियाची कल्पना’, ‘ठेंगा’, ‘एकुलती एक’, ‘गोळाबेरीज’, ‘धुरंधर भाटवडेकर’ या सिनेमांचे पटकथा लेखन, संवाद लेखन त्यांनी केले होते. यातील विविध चित्रपट त्यांनी स्वत: दिग्दर्शित केले आहेत. ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा त्यांचा अलीकडेच आलेला सिनेमा होता.

मालिकाविश्वात त्यांनी ‘आभाळमाया’, ‘दामिनी’, ‘बेधुंद मनाची लहर’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘हुतात्मा’ या वेब सीरिजमध्येही ते झळकले होते. अभिनेत्याच्या जाण्याने लेखन, दिग्दर्शन, पटकथा लेखन, अभिनय या सर्वच क्षेत्रात मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button